मुंबई चौफेर । ४ जानेवारी २०२३ । शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. आर्यन खान बॉलिवूडच्या बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल नोरा फतेहीला डेट करत असल्याची चर्चा आहे. या चर्चा कुठून सुरू झाल्या? तर दुबईतून. होय, दुबईतील काही फोटो व्हायरल झालेत आणि आर्यन व नोराच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.
आर्यन व नोराचे फोटो सर्वप्रथम Reddit वर शेअर केले गेलेत आणि तिथून आगीसारखे पसरले. सोशल मीडियानुसार, हे फोटो दुबईतील आहेत. येथे आर्यनने न्यू ईअर पार्टी दिली होते. या पार्टीत हार्डी सिंधूसह त्याचे अनेक मित्र दिसत आहेत. याचठिकाणी नोराही दिसली. त्यामुळे नेटकाऱ्यानी दोघांच्या अफेअरबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.