भाजपने कंबर कसली, नितेश राणे पूनम महाजन यांच्यावर सोपवली जबाबदारी

बातमी शेअर करा

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. आता या लढाईत राणे आणि महाजन महत्वाची भूमिका बजावणार आहेत.भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार पूनम महाजनांना शिवसेनेशी पंगा घेणे फायद्याचे ठरले आहे.
भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप आता आमने सामने ठाकले आहेत.

महापालिकेतील शिवसेनेचे सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपनं या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे. . भाजपने पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी महाजनांची तर निवडणूक संचालन समितीत राणेंची नियुक्ती करण्यात आली आहे.जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पूनम महाजन यांनी शिवसेनेच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना तिकीटही देण्याबाबत साशंकता होती.भाजपा नेत्या पुनम महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. नाण्याची ती बाजू ठाकरे असतील तर दुसरी बाजू महाजन आहेत.उद्या जर भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत वक्तव्य कोणी केलं. तर आम्हीही पलटवार करू शकतो, असा इशारा भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी दिला आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राणेंच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. राणे हे सातत्याने शिवसेनेशी पंगा घेत असतात. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत राणेंच्या पॅनेलने सत्ता मिळवली आहे. नितेश यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि बंधू माजी खासदार निलेश राणेही हेसुद्धा शिवसेनेशी कायम पंगा घेत असतात. यामुळे राणेंवर महापालिका निवडणुकीआधी मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
#bjp#mmbaiupdates#mumbai#niteshrane#politicalnews#politicalupdates#punammahajan#shivsena
Comments (0)
Add Comment