पुस्तक प्रेमी – आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती

पुस्तक प्रेमी - आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती
बातमी शेअर करा

पुस्तक प्रेमी – आदर्श गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक पदोन्नती

श्री.बिऱ्हाडे यांचा धरणगांव येथील सामाजिक संघटनांकडून शाल,पुष्पगुच्छ;ग्रंथ देऊन निरोप

धरणगांव – धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवीकिरण बिऱ्हाडे यांची मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. आज त्यांना बी आर सी धरणगांव येथे सामाजिक शैक्षणिक संघटनांकडून शाल पुष्पगुच्छ व सावित्रीमाई फुले यांचा जीवन ग्रंथ देऊन निरोप देण्यात आला.

सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी रविकिरण बिऱ्हाडे साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची शैक्षणिक कारकीर्द शिक्षकी पेशापासून तर अधिकारी होईपर्यंतचा प्रवास विशद केला. आपल्या धरणगाव शहराला आदर्श गटशिक्षणाधिकारी लाभले पण त्यांना मुंबई येथे पदोन्नती मिळाल्याने त्यांच्या मार्गदर्शनापासून आपण वंचित राहू असे दुःख देखील व्यक्त केले. व साहेबांच्या पुढील कारकीर्दीस सर्व सामाजिक, शैक्षणिक संघटनांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

रविकिरण बिऱ्हाडे यांनी सर्व शैक्षणिक, सामाजिक संघटनांचे आभार व्यक्त करत सर्वांशी दिलखुलास चर्चा केली. माझ्या या सेवेमध्ये कोणाचं मन दुखावले गेले असेल तर राग मानू नये. धरणगावकरांनी मला अतिशय प्रेम दिले. मी धरणगावकरांना कधीही विसरणार नाही. आपल्याला केव्हाही मदत लागली तर मला आवाज द्या मी शक्य तेवढी मदत करेल अशी प्रतिपादन बिऱ्हाडे यांनी केले.
याप्रसंगी आदर्श शिक्षक कैलास पवार, संजय गायकवाड, महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक एच डी माळी, पी डी पाटील, गुड शेफर्ड शाळेचे आदर्श शिक्षक लक्ष्मण पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे गोरख देशमुख, तर जि प शाळा धरणगाव तर्फे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, आर बी पाटील, महेंद्र पाटील यांनी साहेबांचा गौरव केला कार्यक्रमास मंदार चाेेैधरी, घनश्याम जाधव ,दिपक पाटील, धर्मेंद्र लाेखंडे, तुळशीराम सैंदाणे उपस्थित होते .

बातमी शेअर करा