ब्रिटनच्या पंतप्रधानांची घोषणा ; ३ हजार भारतीयांना नोकरीसाठी व्हिसा मिळणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १६ नोव्हेंबर २०२२ |इंडोनेशियातील बाली शहरात जी २० शिखर परिषद पार आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत इतर देशांच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित आहेत. नुकतीच मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी भेट झाली. अनेक भारतीय तरुणांना ब्रिटनमध्ये जाऊन नोकरी करण्याची इच्छा असते. व्हिसा मिळणावण्यासाठी या तरूणांना प्रतिक्षा करावी लागते. त्यांच्यासाठी सुनक यांनी मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी भारतीय तरुणांना ब्रिटनमध्ये नोकरीसाठी व्हिसा मिळणार आहे. दरवर्षी तीन हजार तरूणांना नोकरीसाठी ब्रिटनचा व्हिसा मिळणार आहे, अशी घोषणा सुनक यांनी केली आहे.

बातमी शेअर करा