जिल्हयातील १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदण्याचे आवाहन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १८ नोव्हेंबर २०२२ | भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला असून दिनांक 9 नोव्हेंबर, 2022 पासून ते 8 डिसेंबर, 2022 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत.

दिनांक 1 जानेवारी, 2023 किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल. या शिवाय 1 एप्रिल, 1 जुलै, आणि 1 ऑक्टोंबर रोजी किंवा त्याआधी ज्या नागरिकांची वयाची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांना देखील आगाऊ नोंदणी करता येणार आहे.

नागरिकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत किंवा https://nvsp.in व https://voterportal.eci.gov.in या संकेत स्थळावर किंवा Voter Helpline मोबाईल ॲप चा वापर करुन नाव नोंदणी करता येईल. यासाठी दिनांक 19 व 20 नोव्हेंबर, 2022, तसेच 03 व 04 डिसेंबर, 2022 रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी जळगाव जिल्हयातील 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रारुप मतदार यादीत आपले नाव असलेबाबत मतदारांनी खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने करण्यात येत आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा