लंम्पी आजारामुळे धरणगाव व कासोदा येथील गुरांचा बाजार बंद
धरणगाव गुरांवर आलेल्या लम्पी आजारामुळे खबरदारी म्हणून जळगांव जिल्ह्यातील धरणगावचा गुरवारचा व कासोदा येथील गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला असून तसा आदेश निर्गमीत केला आहे.
शेतकरी बंधू पशुधन विक्रेते खरेदीदार यांना सूचित करण्यात आले आहे की, राज्यभरात सध्या गुरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हा संसर्गजन्य आजारासारखा गंभीर आजार असल्याने याची जनावरांना झपाटयाने लागण होत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणगाव चा दर गुरुवारी भरणारा कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव तसेच कासोदा येथील मंगळवारचा गुरांचा बाजार ६/०९/२०२२ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत कुठलीही गुरे विक्रीकरीता आणू नये असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.