धरणगाव विविध विकास सोसायटीची बिनविरोध;निवडणूक न उलगडणारे कोडे
धरणगाव विविध विकास सोसायटी ची निवडणूक बिनविरोध न उलगडणारे कोडे असल्याची चर्चा मतदारांसह नागरीकात होत आहे.धरणगाव विविध विकास सोसायटी ची सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणूक निवडणूकीचा काग्रक्रम जाहीर होऊन 29 एप्रिल ते 6 मे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख होती तसेच अर्ज माघारीची मुदत 24 मे होती व त्याच दिवशी चिन्ह देखील वाटप करण्यात आले शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना कपबशी तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पतंग चिन्ह वाटप करण्यात आले.13 जागांसाठी 61 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते 32 जणांनी 24 मे रोजी माघार घेतल्याने 29 उमेदवार रिंगणात होते.याबाबत वृत्त पत्रांमध्ये 26 मे रोजी धरणगाव विविध विकास सोसायटी च्या निवडणुकीत रंगीत लढत असे वृत्त प्रकाशित झाले होते.यानंतर ही निवडणूक कशी काय बिनविरोध होत आहे असा प्रश्न सूज्ञ नागरीकांत उपस्थित होत आहे.तसेच पॅनल प्रमुखांनी आपल्या मर्जीतील लोकांना निवडण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार केल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.उमेदवारांना चिन्ह वाटप होऊन मत पत्रिका व निवडणूकीचे प्रचा साहित्य देखील छापण्यात आल्यावर ही निवडणूक कशी काय बिनविरोध होत आहे हे सुद्धा न उलगडणारे कोडे आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तडवी नामक व्यक्ती ची नियुक्ती करण्यात आली आहे.26 मे रोजी काही उमेदवारांवर दबाव आणून त्यांचे अर्ज माघारी घेतल्याचे बोलले जात आहे.वास्तविक माघारी ची मुदत 24 मे असतांना 26 मे रोजी माघारीचे अर्ज कसे काय स्विकारले असा प्रश्न नागरीकांत उपस्थित होत आहे.26 मे रोजी माघार घेतलेल्या पैकी काही उमेदवार तक्रार देण्याच्या तयारीत असून न्याय न मिळल्यास न्यायालयात निवडणूकीला आव्हान देणार आहे.5 जून रोजी मतदान होऊन निकाल जाहीर करण्यात येणार होता.या प्रकरणाची जिल्हा उपनिबंधक यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मतदारांनी केली आहे