मुंबई चौफेर | २१ नोव्हेंबर २०२२ | इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवार (दि.२१) रोजी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी असल्याची माहिती समोर आली आहे…
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात जावामध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला असून किमान ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे जमिनीच्या १० किमी खोलीवर होता. या भूकंपामुळे सियांजूर येथील इमारतींचे मोठे नुकसान झाल्याची माहिती सियांजूरचे अधिकारी हर्मन सुहर्मन यांनी यांनी दिली आहे इंडोनेशियाची लोकसंख्या २७ कोटीहून अधिक असून इंडोनेशियाला वारंवार भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि सुनामीचा फटका बसतो.