सुवर्ण महोत्सवी शाळेत महात्मा दिन उत्साहात साजरा
तात्यासाहेबांच्या शैक्षणिक – सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने महात्मा पदवी देऊन गौरव केला-जे.एस.पवार
धरणगांव – दि.११ मे,२०२२ बुधवार रोजी स्थानीय सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “महात्मा दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला.प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक व्ही.टी.माळी यांनी केले. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व ज्येष्ठ लिपिक जे.एस.महाजन यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी सांगितले की, आज संपूर्ण भारतात ११ मे ” महात्मा दिन ” मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या महान सामाजिक, शैक्षणिक क्रांतिकार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मुंबईच्या कोळीवाड्यात रावबहादुर वड्डेवार, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या लाखोंच्या उपस्थितीत सर्व जनतेने व सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे ११ मे १८८८ रोजी ” महात्मा ” पदवी देऊन सार्थ जोतीरावांच्या कार्याचा गौरव केला.
परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासातील असा हा सोन्याचा दिवस त्यानिमित्ताने सत्यशोधक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेणार्या मुंबईच्या कोळीवाड्यातील सर्व बंधू-भगिनींना सादर वंदन करून सर्व भारतीयांना शाळेतील उपशिक्षक पी.डी. पाटील यांनी ” महात्मा दिनाच्या “मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. आधुनिक भारताचे जनक तसेच स्त्री शिक्षणाचे जनक – क्रांतीसुर्य – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याला त्रिवार वंदन केले.याप्रसंगी शाळेतील शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते