अभिनेत्री सनी लिओनी हिचा एक व्हिडिओ समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १९ डिसेंबर २०२२ I शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ हा सिनेमा पुढील महिन्यात 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मात्र, रिलीजच्या एक महिन्याआधीच सिनेमावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. कारण या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात
दीपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे अनेकांनी दीपिकासोबत सिनेमाला ट्रोल करण्यात सुरुवात केली. हा वाद निवळला नाही, तोच आता अभिनेत्री सनी लिओनी हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सनी केशरी रंगाच्या रिव्हिलिंग आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावरून नेटकरीही संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

सनी लिओनी ट्रोल
‘पठाण’ या सिनेमाच्या वादामध्ये सनी लिओनी (Sunny Leone) ही केशरी रंगाचा रिव्हिलिंग आऊटफिटमध्ये दिसत आहे. त्यामुळे ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सनी समुद्रकिनारी कामुक पोझ देत आहे. केशरी रंगाच्या आऊटफिटमध्ये सनी खूपच हॉट दिसत आहे. तिच्या प्रत्येक अदावर चाहते फिदा झाले आहेत. मात्र, कामुक पोझ दिल्यामुळे सनीला ट्रोल केले जात आहे.

सनीच्या या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, “ओह केशरी रंग परिधान करू नको.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “ओह… हिला बॉयकॉट करा. भगवा रंग परिधान करून शूट करत आहे.” आणखी एकाने लिहिले की, “जरा इकडे पाहा, हिनेही त्याच रंगाचे कपडे घातलेत, बॉयकॉट सीन कधीपासून ट्रेंड करायचा आहे?” याव्यतिरिक्त एका युजरने दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्याकडे इशारा करत म्हटले की, “हे पाहा केशरी रंगात सनी लिओनी.” दुसऱ्या एकाने सनीला चेतावणी देत म्हटले की, “आता पाहा भगवा रंग घातल्यामुळे लोक तुलाही बॉयकॉट करतील.”

बातमी शेअर करा