मुंबई चौफेर । ७ एप्रिल २०२२ । (१) हिरो इलेक्ट्रिक : हिरो इलेक्ट्रिक कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीच्या शर्यतीत सर्वात पुढे राहण्यात यशस्वी झाली आहे. कंपनीने केवळ या यादीत पहिलं स्थान मिळवलेलं नाही तर एका महिन्यात तब्बल १३,०००रुपयांपेक्षा जास्त युनिट्स विकणारा हा एकमेव इलेक्ट्रिक ब्रँड बनला आहे. FY२२ मध्ये देखील हा ब्रँड या यादीत अव्वल स्थानावर होता. FY२२मध्ये ब्रँडने ६५,३०३ युनिट्स इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची विक्री केली होती.
(२) ओला इलेक्ट्रिक : ओला इलेक्ट्रिक हा देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँडपैकी एक आहे. ईव्ही निर्मात्या कंपनीने मार्च महिन्यातच आपल्या ओला एस १ प्रो स्कूटरच्या ९,१२१ युनिट्सची विक्री केली. एप्रिल महिन्यात कंपनीला या यादित पहिलं स्थान मिळवायचं आहे.
(३) ओकिनावा ऑटोटेक: ओकिनावा कंपनी दुसऱ्या स्थानावरुन खाली घसरली आहे. या ईव्ही निर्मात्या कंपनीने मार्च महिन्यात ८,२२८ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी मार्चमध्ये नोंदवलेल्या विक्रीच्या तुलनेत ही मोठी उडी आहे. कारण गेल्या वर्षी मार्चमध्ये या कंपनीने १,५३० युनिट्सची विक्री केली होती. Okinawa Autotech ने अलीकडेच त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ockhi ९० लाँच केली आहे आहे. त्यामुळे कंपनीला एप्रिलमध्ये विक्रीच्या आकडेवारीत वाढ अपेक्षित आहे.
(४) अँपिअर व्हेईकल : झपाट्याने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये अँपिअरने चौथे स्थान मिळवले आहे. या ई-स्कूटर कंपनीने मार्च २०२२ मध्ये ६,३३८ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये विकल्या गेलेल्या ९४१ युनिट्सपेक्षा ही विक्री खूप जास्त आहे.
(५)ॲथर एनर्जी : ॲथरने इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये पाचवे स्थान कायम ठेवले आहे. मार्च २०२२ मध्ये कंपनीने २,२२२ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १,०६४इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या.