माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ धरणगाव तालुकाध्यक्षपदी शिंदे तर,शहराध्यक्षपदी पवार यांची नियुक्ती
धरणगाव : स्वराज बहूउद्देशीय संस्थेद्वारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी सतिष खंडू शिंदे सर यांची तर, शहराध्यक्षपदी निलेश अशोक पवार सर, यांची दि.६ सप्टे, मंगळवार रोजी नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुंबई येथील कार्यालयातील घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशीनुसार सर्वानुमते ही निवड करण्यात आली. केंद्रीय माहिती अधिकार २००५ हा जनसामान्यांचा कायदा असून या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी, लोकाभिमूख व भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणे हा या माहिती अधिकाराचा उद्देश आहे.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतिष शिंदे हे पिंप्री येथील आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असून महाराष्ट्र न्यूज 21 चे संपादक आहेत तसेच, नवनियुक्त शहराध्यक्ष निलेश अशोक पवार हे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. व राष्ट्रीय बेरोजगार युवा मोर्चा संघटनेत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. अश्या सामाजिक कार्याचा माध्यमातून पंचक्रोशीत सुपरिचित असलेले निलेश पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई चौफेर ई पेपर चे तालुका प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे सतिष शिंदे व निलेश पवार यांनी आपल्या लेखणीतून अनेक शेतकऱ्याच्या व्यथा, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, शासनाच्या विविध रोजगारांच्या संधी मिळविणे. शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देणे तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून दोघांचे कार्य कौतुकास्पद आहे. अश्या विविध माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मुख्य उपस्थित राज्य निवड समीतीने सतिष शिंदे व निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.