तहानलेल्या धरणगावात दलित वस्तीवर न.पा प्रशासनाचा अन्याय;निलेश पवार
धरणगाव : गेल्या चाळीस वर्षापासून धरणागाव शहरात पाण्यासाठी नागरिकांना कधी पायपीट करावी लागते तर कधी वणवण भटकावे लागत आहे.मात्र पाण्याची समस्या काही सुटायचे नाव घेत नाही.जणूकाही हा जन्मसिद्ध हक्क धरणगावकरांचा झाला आहे. असे यातून दिसून येते.अनेक वर्षापासून निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष निवडून येण्यासाठी धरणगावकराना राजकीय दूषित पाणी पाजून निवडून जातात. परंतु पाण्याचा प्रश्न आहे तसाच रेंगाळत ठेवण्यात येतो.अनेक मोर्चे आंदोलने पाण्यासाठी धरणगाव वासियाकडून करण्यात आले मात्र पाण्याची समस्या कायम आहे.शहरातील हातपंप देखील बंद अवस्थेत पडून आहेत.वेळेवर पाणी मिळत नसल्याने धरणगाव शहरातील नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत.नगरपालिका कडून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.मात्र गौतम नगर दलितवस्ती भागात अद्यापही पाण्याचे एक ही टँकर आलेले नाही परिसरातील गोरगरीब नागरिकांकडे स्वतःची पाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.दलितवस्ती वासियांना पाणीपुरवठा न करून धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी हेतुपुरस्कर अन्याय केला आहे. असा आरोप बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार यांनी केला असून मुख्याधिकाऱ्यांच्या दूर्लक्षित भूमिकेविरोधात सामाजिक न्याय विभाग व अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जाणार असल्याचे निलेश पवार यांनी सागितले आहे