अभिनेत्री क्रिती सेनन प्रभासला करतेय डेट ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ३० नोव्हेंबर २०२२ I ‘हिरोपंती‘ हा सिनेमा आठवतो का? या सिनेमातून अभिनेत्री क्रिती सेनन हिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. 2014 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानंतर क्रिती चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली होती. यानंतर क्रितीने अनेक हिट सिनेमे दिले. यामध्ये तिने वेगवेगळ्या सुपरस्टार्ससोबत काम केले. अशात तिचे नाव एका सुपरस्टारसोबत जोडले जात आहे. तो इतर कुणी नसून प्रभास आहे. अशा चर्चा आहेत की, ‘आदिपुरुष‘ सिनेमातील सहकलाकार प्रभासला क्रिती गुपचूप डेट करत आहे. नुकतेच वरुण धवन यानेही क्रितीला प्रभाससोबतच्या नात्यावरून चिडवले होते. या सर्वांमध्ये आता अभिनेत्रीने डेटिंगच्या या अफवांना एकदाचा पूर्णविराम लावला आहे.

क्रितीने दिले स्पष्टीकरण
अभिनेत्री क्रिती सेनन हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर डेटिंगविषयीच्या चर्चांबद्दल स्पष्टीकरण दिले. तिने स्पष्ट करत म्हटले की, एका रियॅलिटी शोमध्ये वरुणच्या चेष्टेने मर्यादा पार केली होती. त्यावरून लोकांनी प्रभाससोबत ती सिक्रेट रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला होता. ती म्हणाली की, वरुणच्या मजेशीर चेष्टेने नवीन अफवांना जन्म दिला. मात्र, या सर्व अफवा आधारहीन आणि खोट्या आहेत.

क्रितीची इंस्टा स्टोरी
क्रितीने इंस्टा स्टोरीवर शेअर करत नोटमध्ये लिहिले की, “हे प्रेमही नाहीये आणि पीआरही नाहीये. आमचा भेडिया एका रियॅलिटी शोमध्ये जरा जास्तच जंगली झाला आहे. त्याने मजेशीर चेष्टेने काही ओरडणाऱ्या अफवांना जन्म दिला आहे. यापूर्वीही कोणत्यातरी पोर्टलने माझ्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. मला तुमचा फुगा फोडू द्या. अफवा आधारहीन आहेत

बातमी शेअर करा