मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । आलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये अन्न महागाईचा इंडेक्ट १५९.३ च्या सर्वोच्च स्थरावर पोहोचला आहे. फेब्रवारी महिन्यात अन्न महागाईचा इंडेक्ट १४०.७ वर होता. म्हणजेच काय तर अवघ्या एका महिन्यात अन्न महागाईमध्ये तब्बल १७ % वाढ झाली आहे. अन्न महागाई वाढण्यासाठी मुख्य घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किमती. मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या किमतीमध्ये तब्बल २३ % वाढ झाली आहे. खाद्यतेल आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थरावर पोहोचले आहे. खाद्यतेलासोबतच साखर आणि दूधाचे देखील भाव वाढले आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा जागतिक आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेसह नाटोचे सदस्य असलेल्या युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातल्या मुळे याचा फटका हा वस्तुच्या आयात निर्यातीला बसला आहे. वस्तुची आयात निर्यात प्रभावित झाली असून, पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने वस्तुचे दर गगनाला भिडले आहेत. कच्चा तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. सोबतच गहू आणि इतर धान्याच्या दरामध्ये देखील तेजी दिसून येत आहे. अन्न महागाई वाढल्याने त्याचा परिणाम हा हगंर इंडेक्सवर होत असून, हगर इडेक्स देखील वाढला आहे.