धरणगाव प्रतिनिधी | निलेश पवार
धरणगाव येथे नुकतीच तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यानिवडीबद्दल धरणगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्षपदी राजेंद्र वाघ व शहराध्यक्षपदी विनोद रोकडे यांचा शासकीय विश्रागृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव राजू बाविस्कर व शहराध्यक्ष संदिप फुलझाडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी तालुका सचिव श्री राजू बाविस्कर म्हणाले की, पत्रकारांसाठी सर्व राजकीय पक्ष एकसारखेच असतात. त्यांच्याकडून सर्वांना सारखाच सन्मान मिळतो. पुढील काळातही पत्रकारांचा योग्य तो सन्मान व सहकार्य केले पाहिजे, असे श्री. बाविस्कर यांनी सांगितले. नवनियुक्त तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांचा निवडीबद्दल सत्कार करतांना धरणगाव तालुका मनसे चे शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, उपाध्यक्ष मुस्तफाखान, ता.उपाध्यक्ष कृष्णा पाटील, ता. सचिव राजू बाविस्कर, मयूर गुरव, विकास पारधी, सोनू कोळी,महेंद्र कोळी,शुभम चौधरी, सुनील लोहार,अक्षय कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.