दोन वर्षी कोरोनाच्या संकटमय परिस्थिती मुळे MBBS ची परिक्षा पुढे ढकण्यात आली होती. यामुळे,यामुळे 8 हजार विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी पुर्ण झालेला नाही. नीट-पीजी’ 2021 चे कौन्सिलिंग आणि ‘नीट-पीजी’ 2022 च्या परीक्षा यांच्या तारखा एकाचवेळी आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट-पीजी’ परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकली आहे.
नीट प्रवेश प्रक्रिया आणि आणि नीट पीजी परिक्षा एकाच महिन्यात येत असल्याने वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या देशभरातील विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. नीट-पीजी’ परीक्षा 12 मार्च रोजी पार पडणार होती, मात्र सरकारच्या निर्णयामुळे ही परिक्षा आता एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तारखांचा घोळ असल्याचे सांगत असंख्य विद्यार्थ्यांनी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी चालविली होती. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलली जात असल्याचे आरोग्य सेवा खात्याच्या सचिवांनी आदेशात म्हटले आहे.
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन केली आहे तसेच नीट पीजी परिक्षा जुन- जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले. या मुद्यावर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियात मोहिम चालवली होती तर काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केलेली आहे. नेहमी या परिक्षा किमान दोन महिन्यांच्या फरकाने घेण्यात येतात.त्यामुळे,हा निर्णय हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून परिक्षेच्या वेळेतील दोषामुळे देशभरातील 8 हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टर परिक्षेसाठी पात्र ठरणार नाही. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.