दिवंगत सुरेश चंदेल यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न

दिवंगत सुरेश चंदेल यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न
बातमी शेअर करा

दिवंगत सुरेश चंदेल यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न

मूकबधिर विद्यार्थ्यांना सौ.जाधव यांनी राखी बांधून जपली सामाजिक बांधिलकी

धरणगाव आजच्या युगात पुण्यतिथी कार्यक्रमावरती हजारो रुपये खर्च केला जातो.पण धरणगाव येथील लोकनेते दिवंगत सुरेश आप्पा चंदेल यांच्या मित्र परिवार,यशवंत पतसंस्था,मूकबधीर विद्यालय, मॉर्निंग गृप व मंगलादेवी आणि मुन्नादेवी फाऊंडेशन यांच्या वतीने पुण्यतिथी कार्यक्रम निमित वायफळ खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, रेल्वे स्थानकाच्या परिसरात वृक्षारोपण, मूकबधीर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना भोजन, ग्रामीण रूग्णालयात रुग्णांना फळे वाटप तसेच ज्योतीदेवी फाउंडेशन तर्फे गरजू व निराधार बांधवांना भोजनाचे डबे व मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच, याप्रसंगी लिटिल ब्लॉसम स्कूलच्या सचिव सौ. ज्योती जाधव यांनी मूकबधीर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत रक्षाबंधन निमीत्त राखी बांधून सर्वांशी हितगुज करुन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.श्रीमंत असो की गरीब पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाहुणे, मित्र मंडळी यांना बोलावून विधी, मंडप, भजन, कीर्तन, प्रवचन, भोजन, इतर खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहेत. शिवाय वाढती महागाई असून तरी देखील समाजात अशा प्रवृत्तींना ऊत आला असून सर्व काही असतांना देखील समाजासाठी आपलं काही देणं लागतं या समता व बंधुतेच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून लोकोपयोगी उपक्रम राबवून दिवंगत सुरेशआप्पा चंदेल यांच्या मित्र परिवाराने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी यशवंत ना.सह.पतसंस्थेत संचालक व मित्रपरिवाराने दिवंगत सुरेशआप्पा चंदेल यांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली वाहिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी यशवंत पतसंस्थेचे शाखाधिकारी किरण मराठे, अनिल शाह, प्रमोद रामकृष्ण वाणी, विनोद लोहार, आर एच पाटील, रविंद्र बिचवे, राजेंद्र न्हायदे, महेश पवार, विक्रम जोशी, बिपिन भाटिया, दिपक जाधव, रामकृष्ण पाटील, बापू जाधव, पिंटू पवार, किरण चव्हाण, दिपक मराठे, सुधाकर माळी, विलास बयस यांच्यासह इंदिरा विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी केले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment