लव्ह रंजन दिग्दर्शित या सिनेमाचे टायटलच अद्याप कोणाला माहित नव्हते. मात्र आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर ‘टीजेएमएम’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘टीजेएमएम’ मधुन श्रद्धा आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच एकत्र सिनेमात काम करणार आहे. सिनेमाच्या टायटलची घोषणा आज करण्यात आली आहे. तर ‘तू झुठी मै मक्कार’ असे लव्ह रंजन यांच्या सिनेमाचे नाव आहे.
अनेक दिवसांपासून श्रद्धा आणि रणबीरच्या जोडीची आणि या चित्रपटाची चर्चा होती. मात्र नाव जाहिर करण्यात आले नव्हते. सिनेमाच्या शूटिंग सेटवरचे फोटो व्हिडिओही व्हायरल झाले. मग ‘तू झूठी मै मक्कार’ हे नाव आज जाहिर करण्यात आले असून चाहते व्हिडिओला पसंती देताना दिसत आहेत.