महात्मा फुले हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा…

महात्मा फुले हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा...
बातमी शेअर करा

महात्मा फुले हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा…

धरणगांव येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे कामकाज इ.१० वी च्या मुला – मुलींनी पाहीले. मुख्याध्यापक,पर्यवेक्षक ,शिक्षक व शिपाई या सर्व भूमिका मुलांनी साकारल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी मुख्याध्यापिका कु.सोनाली पाटील , पर्यवेक्षक कु.किर्ती सैंदाणे होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.पी.आर. सोनवणे व पर्यवेक्षक एम.बी.मोरे होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्त्री शिक्षणाचे जनक – शिक्षणतज्ञ – महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थी मुख्याध्यापिका कु. सोनाली पाटील ने शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांचा शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. सर्वच विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी कु.क्रांती पाटील, दामिनी पाटील, सपना घिसाडी हीने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले तर कु. हर्षदा महाजन, अंकिता पाटील, चंद्रकांत जावरे, अर्पण जाधव, रोहित माळी, ऋषिकेश भोई ने विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक श्री.पी.डी.पाटील सर यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधुन विद्यार्थिनी मुख्याध्यापिका कु.सोनाली पाटील हिला “विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले ” इतिहासतज्ञ प्रा.हरी नरके लिखित अनमोल ग्रंथ भेट दिला. यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी आप – आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी मुख्याध्यापिका सोनाली पाटील हीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.किर्ती सैंदाणे , कु. हर्षदा महाजन तर आभार कु.क्रांती पाटील हीने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एन.कोळी ,पी.डी. पाटील शिक्षक बंधु -भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment