धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांचे फेसबुक तिसऱ्यांदा हॅक…
धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांचे फेसबुक अकाउंट तिसऱ्यांदा हॅक झाल्याने यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटच्या युगात शहरी भागासह ग्रामीण भागांमध्ये देखील सोशल मीडियाच्या वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आधी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या घटना घडत होत्या मात्र आता हॅकर्ससांनी त्यांच्या मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये देखील फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप आणि अनेक सोशल माध्यमे हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना काही दिवसापूर्वी धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांचे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक करून प्रमोद पाटील यांच्या जवळच्या अनेक मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांच्या मागणीचे मेसेज करीत असल्याचा प्रकार समोर आला. पाटील यांनी हतबल होऊन धरणगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला असता पोलिसांनी मार्गदर्शन करुन तुम्ही जळगाव येथील सायबर पोलिसांकडे तक्रार करा अशा सूचना प्रमोद पाटील यांना केल्या. तूर्तास या घटनेतील हॅकर्स मात्र अपरिचित राहिला आहे. फेसबुकचा वापर झाल्यावर फेसबुक लॉग आउट करावे, व पासवर्ड देखील अनेक वेळा बदलावे अशी काळजी फेसबुक वापरकर्त्यांनी घेणे गरजेचे आहे.अशी घटना कोणासोबत घडल्यास त्या अकाउंट विरोधात फेसबुक टीमला हॅक झालेल्या अकाउंट विरुद्ध फेक अकाउंट म्हणून रिपोर्ट करावा असे आव्हान सोशल मीडिया जाणकारांनी केले आहे