देश पातळीवरील नेत्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही; आबासाहेब राजेंद्र वाघ
केतकी चितळे विरोधात धरणगाव सत्यशोधक विचार मंचचे पोलिसात निवेदन
धरणगाव – माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करावी,अशी मागणी सत्यशोधक विचार मंचचे राजेंद्र वाघ यांसह शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे केली आहे.
निवेदनात नमूद असे, आपल्या देशाचे लोकनेते शरद पवार यांच्या विरोधात समाज माध्यमात अत्यंत खालच्या शब्दात संत महापुरुषांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी अभंग सदृश्य पोस्ट केतकी चितळे नामक एका विकृत मानसिकता असलेल्या महिलेने फेसबुक पेज वरून समाज माध्यमावर प्रसारित केली आहे. व त्या सदरील पोस्ट चा लेखक ऍड.नितीन भावे आहे.
शरद पवार यांनी देशाला विविध क्षेत्रामध्ये गती देवून लोकविकासाच सातत्याने काम केले, अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये देशाला पॅटर्न देणारे महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण केली. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे. त्याचप्रमाणे त्यांचे भारतभरातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान आहे, मात्र केतकी चितळे हिने त्यांच्या आजाराबाबत जगतगुरु तुकाराम महाराजांचे नाव घेऊन अत्यंत विकृत स्वरूपाचे लिखाण केले आहे. ह्या लिखाणात फक्त शरद पवारांचाच अपमान नाही तर सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रात ज्या – ज्या महनीय व्यक्तींनी सबंध आयुष्य खर्ची केले त्यांच्याही अपमान आहे. त्यामुळे केतकी चितळे हिने अभंग सदृश्य “तुका म्हणे” या पद्धतीचा शब्द प्रयोग करून अगदी अश्लाघ्य भाषेतील लिखाण प्रसारित केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वीही सामाजिक ऐक्य धोक्यात येईल असे आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल असताना जाणीवपूर्वक अशा पोस्ट करणे कितपत योग्य आहे. अशा प्रवृत्ती समाजाला घातक आहेत तरी केतकी चितळे विरुद्ध आयपीसी, आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा व अशा प्रवृत्तीला आळा घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन धरणगाव सत्यशोधक विचार मंचचे पदाधिकारी राजेंद्र वाघ, बाळासाहेब जाधव, नगर मोमीन, सुनील देशमुख, आकाश बिवाल, देवानंद चव्हाण, करीम लाला मोमीन, ओंकार माळी, जितेंद्र पाटील आयुब खान, विकास पाटील आदींनी पोलिस निरीक्षक राहूल खताळ सो, यांसह सहा. फौजदार योगेश जोशी, पोना. वैभव बाविस्कर,समाधान भागवत, विनोद संदानशिव यांच्याकडे निवेदन सादर केले.