ग्रामीण रुग्णालयात इजीसी मशिन व शस्त्रक्रिया गृह सुरू
जनसामान्यांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी तत्पर;डॉ.मनोज पाटील
डॉ.पाटील यांनी निम्म्या मागण्या पूर्ण केल्याने समाधान;लक्ष्मणराव पाटील.
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ईसीजी मशिन दाखल झाले असून आज ५ रुग्णांवर कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ग्रामीण रुग्णालयात पायाभूत वैद्यकीय सुविधा असाव्यात यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील व त्यांच्या मित्र परिवाराने साखळी उपोषण केले होते. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील सरांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर या उपोषणाची सांगता झाली. उपोषणाची सांगता होऊन ८ दिवस होत नाही तोवर ग्रामीण रुग्णालयात सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. आज डॉ. मनोज पाटील यांनी ५ रुग्णांवर कुटुंब नियोजन च्या शस्रक्रिया करत शस्रक्रिया गृह पूर्ववत केले त्याचप्रमाणे ईसीजी मशिन देखील रुग्णालयात दाखल झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसराची पाहणी केली असता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी सकारात्मक संवाद साधून येत्या दोन दिवसात साफसफाई होईल, ग्रामीण रुग्णालयाची लाईट व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. जवळ – जवळ निम्म्या मागण्या पूर्ण करण्यात आले आहेत. जनसामान्यांच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर असून ग्रामीण रुग्णालयात सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासक शब्द वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी दिले.
आपल्या उपोषणाची सकारात्मक दखल घेऊन फक्त बोलून नव्हे तर कृतीतून बदल करणाऱ्या डॉ. पाटील सरांचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. तसेच यापुढे देखील अशाच पद्धतीने जनतेच्या आरोग्यासाठी कटिबद्ध राहण्याचा आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील, आबासाहेब राजेंद्र वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, डॉ. गिरीष चौधरी, डॉ.रश्मी भोळे, लिपिक रोहित खंडारे, न.पा. निरीक्षक निलेश वाणी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील, पी.डी.पाटील, सूरज वाघरे, आनंद पाटील, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, प्रफुल पवार, भुषण भागवत, विजय महाजन, अमोल सोनार, गोपाल पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे राजेंद्र करोसिया, नामदेव मराठे, विजय पाटील आदी सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.