भुसावळात पाच जणांवर हद्दपारीची कारवाई

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १२ नोव्हेंबर २०२२ | भुसावळ शहरातून पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यात चार जणांच्या टोळीला दोन वर्षासाठी तर एकाला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश प्रांत रामसिंग सुलाने यांनी बजावले आहेत.

सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या टोळी प्रमुख असलेला गौरव सुनील बढे, जितेंद्र शरद भालेराव, सचिन अरविंद भालेराव आणि भावेश कांतीलाल दंडगव्हाळ ही चार जणांची टोळी तसेच कृष्णा खरारे याचा हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नागरिकांना शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे, अवैध शस्त्र वाढविणे असे अनेक गुन्हे दाखल होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम