IMDb च्या यादीत आलिया, अल्लु अर्जुनसह यांना मिळालं स्थान

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ७ डिसेंबर २०२२ I नुकतीच चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोताने 2022 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे.

IMDb वर असलेल्या महिन्याला 20 कोटी विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप टेन यादी जाहीर केली आहे. द ग्रे मॅन आणि तिरूचित्राम्बालाम यासह अनेक भाषांमध्ये सफल कलाकृतींमध्ये भूमिका बजावलेला धनुष या वर्षीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे.

या यादी मध्ये अव्वल स्थानावर आहे अभिनेता धनुष. तर आलिया भट्ट, ऐश्वर्या राय बच्चन, राम चरण तेजा, समंथा रूथ प्रभू,हृथिक रोशन, कियारा अडवानी, एन. टी. रामा राव ज्यु., अल्लु अर्जुन, यश हे कलाकार 2022 च्या टॉप १० मध्ये सहभागी असलेले कलाकार आहेत. हा आकडा दर महिन्याला येणाऱ्या 20 कोटी विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूवर हे रँकिंग आधारित आहे.

”जगभरातील लोक भारतीय सिनेमा, वेबसिरीज आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी IMDb वर येतात आणि भारतीय कलाकारांची आमची टॉप 10 यादी ही जागतिक प्रसिद्धी निर्धारित करण्याचा आणि करिअरमधील मुख्य टप्पे आणि लक्षवेधी क्षण ओळखण्याचा मापदंड ठरली आहे,” असं IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटलं. ”विविध क्षेत्रांमधील कलाकारांना जगभर नावाजलं जातं व देशामध्ये त्यांच्या प्रतिभेच्या उंचीचे हे निदर्शक आहे. धनुषसारख्या कलाकाराला मान्यता मिळून तो हॉलीवूड अभिनेते जसे रायन गोसलिंग आणि क्रिस इव्हान्सच्या सोबत भूमिका करताना दिसला आणि त्याबरोबर प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या RRR चित्रपटातील एन टी रामा राव ज्यु आणि राम चरण तेजा ह्यांचंही कौतुक केलं जातं. समीक्षक आणि चाहत्यांनीही चित्रपटांमध्ये परतलेल्या ऐश्वर्या राय बच्चनचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.”

IMDb सोबत एक्सक्लुझिव्हली बोलतना आलिया भट्टने ह्या वर्षीच्या यादीमध्ये तिचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ”हे माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भात आत्तापर्यंतचे सर्वांत संस्मरणीय वर्ष ठरले आहे. ह्या वर्षी माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमी त्यांची ऋणी राहीन आणि आपल्या देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते व कलाकारांसोबत काम करणे, हा माझा गौरव आहे असं मला वाटतं. IMDb हे लोकांच्या मनामधील भावना दर्शवणारे खरं माध्यम आहे आणि मला आशा आहे की, मी‌ जोपर्यंत कॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. खूप सारं प्रेम. आपल्याला परत एकदा धन्यवाद.”

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम