सावळ्या रंगामुळे झाली होती प्रियांका चोप्रा बॉडी शेमिंगची शिकार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ८ डिसेंबर २०२२ I बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर हॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करत आहे.

आज तिला मिळालेल्या यशामागे खूप मोठे कष्ट आहेत. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात खूप संघर्ष केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, पुरुष कलाकारांच्या मते महिला अभिनेत्रींना समान फी मिळत नाही. यासोबतच प्रियंकाने सेटवरील वागणुकीबाबतही मोठे खुलासे केले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रत्येक मुद्द्यावर आपले खुले मत मांडते. प्रियांका चोप्रा केवळ अभिनेत्रीच नाही तर एक निर्माता आणि व्यावसायिक महिला देखील आहे. आज तिने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा तिला आपल्या रंगामुळे काळी मांजर म्हटलं जायचंप्रियांका चोप्राने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. प्रियंका म्हणाली, ‘मला समजले नाही की लोक मला डस्की का म्हणायचे? मला मी फारशी सुंदर नाही असं मला वाटायचं’.प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, ‘मला वाटायचे की मी पुरेशी सुंदर नाही आणि त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल’. प्रियांका पुढे म्हणाली, ‘मला वाटायचे की गोरे लोक जास्त टॅलेंटेड असतात, म्हणून त्यांची तुलना केली जायची. त्यावेळी या सर्व गोष्टी योग्य वाटल्या कारण जे काही घडत आहे ते सामान्य आहे असे वाटलं

याशिवाय प्रियांका चोप्राने इंडस्ट्रीत होत असलेल्या भेदभावावरही बोट ठेवलं. अभिनेत्रीने सांगितले की, इंडस्ट्रीत तिला हिरोएवढी फी मिळाली नाही. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 60 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण असे असूनही तिला कोणत्याही चित्रपटात हिरोपेक्षा जास्त पैसे मिळाली नाही. अभिनेत्री म्हणाली, ‘मला माझ्या पुरुष सहकलाकारांच्या पगाराच्या फक्त 10 टक्के रक्कम देण्यात आली होती. वेतनातील ही तफावत मोठी आहे.’

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम