अभिनेत्री पवित्रा पुनिया लवकरच लग्न करणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २४ डिसेंबर २०२२ I वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसच्या घरात किती तरी कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहीची लव्हस्टोरी घरातच संपत तर काहीचं नातं टिकतं.

अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान या स्टार कपलची जोडी ही यातील एक आहे. ‘बिग बॉस 14’ दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलं. दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशीपमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी साखरपुडा देखील केला आहे. आता अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा प्लान सांगितला आहे.

पवित्रा पुनियाने एका मुलाखतीत सांगितले आहे की ती कधीही लग्न करू शकते. त्यांच्या एंगेजमेंटप्रमाणेच त्यांचे लग्नही अचानक होणार आहे. पवित्रा म्हणाली, “तुम्ही ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंटचे फोटो पाहिलं त्याचप्रमाणेच आमचं लग्नही कधीही अचानक होईल. आम्हाला कोणतीही प्लान नाही करायचा आहे. जेव्हा व्हायचं तेव्हा ते व्हाईल आणि मग मी ही बातमी जगाला सांगेन. त्याआधी मला काही बोलायचे नाही.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम