‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २४ डिसेंबर २०२२ I बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती हे दोघे त्यांच्या आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ मुळे चर्चेत आहे.
हे दोघे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सोबत दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत नुकतीच एक नवीन अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.


या पोस्टरमध्ये दोन हात दिसत असून त्या दोन्ही हातामध्ये ग्लास दिसत आहे. या पोस्टरमध्ये असलेल्या ग्लासच्या काचा तुटलेल्या दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने त्याला कॅप्शन दिले आहे की,”हा चित्रपट तमिळ आणि हिंदी भाषांत 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” कतरिना कैफने ही माहिती शेअर करताच, चाहते या चित्रपटासाठी अधिक उत्सुक झाले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम