उर्फी जावेदने तुरुंगातून व्हिडिओ केला शेअर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २३ डिसेंबर २०२२ I उर्फी जावेद सध्या दुबईत असून तिचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. उर्फीला तिच्या बोल्ड आउटफिटमुळे दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले, अशा बातम्या चर्चेत आहेत.


या बातमीनंतर उर्फीला खूप ट्रोलही करण्यात आले, अनेक धमक्याही मिळाल्या. अशा बातम्यांवर उर्फीने समाजाचा दृष्टिकोन मांडताना तिची व्यथा मांडली आहे. उर्फीने सोशल मीडियावर अनेक फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून समाजातील वास्तव दाखवले आहे.

उर्फी जावेद हिने ती तुरुंगात असतानाचा एक व्हिडिओ (फिल्टरसह) शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, “संपूर्ण भारताला यावेळी मला असेच पाहायचे आहे.” तिच्या या व्हिडिओवर एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, “थॅंक यू दुबई, कृपया तिला तिथेच ठेवा.” उर्फीने देखील त्या कमेंटवर प्रतीउत्तर दिले आहे.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम