व्हरायटी मॅगझीनमध्ये ज्युनिअर एनटीआर टॉप 10 च्या यादीत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ६ जानेवारी २०२३ । RRR चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता ज्युनिअर एनटीआरला प्रसिद्ध व्हरायटी मॅगझीनने टॉप 10 कलाकारांमध्ये स्थान दिले आहे. खरंतर, ही यादी अजून जाहीर करण्यात आली नाही. मात्र, या मॅगझीनच्या अंदाजानुसार ज्युनिअर एनटीआर टॉप 10 च्या यादीत आपलं स्थान मिळवू शकतो. असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

RRR स्टारने ऑस्करमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’साठी व्हरायटीच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवले आहे. तो ह्यू जॅकमन (द सन) आणि विल स्मिथ (एमॅन्सिपेशन) या सारख्यांमध्ये सामील होतो. ज्युनियर एनटीआरला याची माहिती मिळताच, ‘ऑस्करसाठी आरआरआर’ ट्विटरवर ट्रेंड करू लागला. ऑस्टिन बटलर एल्विसमधील त्याच्या कामासाठी यावर्षी हा पुरस्कार जिंकेल, असा अंदाजही वर्तवला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम