निक्कीच्या ताज्या फोटोशूटने लावले चाहत्यांना वेड

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १३ डिसेंबर २०२२ I ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतात आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात.

निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असून, ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. दरम्यान, असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा करून दाखवलं आहे.

हो. निक्कीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड आणि मादक फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा सिझलिंग लूक दिसला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जर तुम्ही हे फोटो पहिले तर यात अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमर्स लूकमध्येही बोल्डनेसची भर घातली असल्याचं दिसून येईल. येथे तिने लाल रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने न्यूड मेकअप केला आहे. हा लूक दाखवत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अनेक हटक्या पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये निक्की कमालीची सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री चाहते देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तिचा मादक अंदाज चाहत्यांना वेड लावणार आहे. नेटकरी अद्यापही या बोल्ड फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले असून, सर्वच जण तिच्या प्रेमात पडले आहेत

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम