पलक तिवारी आणि इब्राहिम खानच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १३ डिसेंबर २०२२ I टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम पुन्हा एकदा सोबत दिसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे.

यापूर्वीही ते दोघे एकत्र दिसल्याने दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. पण आता पुन्हा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे
पलक आणि इब्राहिम यांना 11 डिसेंबर रोजी एका कॉन्सर्टमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं. समोर आलेल्या फोटोंमध्ये पलक आणि इब्राहिमसोबत त्यांचे मित्रमंडळी देखील दिसत आहेत. या कॉन्सर्टचे फोटो जान्हवी कपूरचा मित्र ओरहन अवत्रमणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये ओरहन पलक आणि इब्राहिम दोघांसोबत पोज देताना दिसत आहे. तिघांचा फोटो अमेरिकन रॅपर मेलोनच्या मुंबईतील कॉन्सर्टचा आहे. या कॉन्सर्टमध्ये ओरहन, पलक आणि इब्राहिम यांच्या शिवाय अन्य सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.

अमेरिकन रॅपर मेलोनच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेता सुनील सेट्टीचा मुलगा अहान सेट्टी, कार्तिक आर्यन, विजय वर्मा, तमन्ना भाटिया, मलायका अरोरा आणि मृणाल ठाकूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

पलकबद्दल सांगायचं झालं तर, आई श्वेताप्रमाणेच पलक देखील मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. लवकरच तिचा बॉलिवूड चित्रपट ‘रोझी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे इब्राहिम देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण पलक आणि इब्राहिम त्यांच्या नात्यामुळे अधिक चर्चेत असतात.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम