आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागतर्फे सावखेडा येथे समता सप्ताहा संपन्न
आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागतर्फे सावखेडा येथे समता सप्ताहा संपन्न
धरणगाव | प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या आदेशाने सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रवादी समता सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना अहिरे यांनी आज रोजी सावखेडा येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली व पत्रके वाटप करण्यात आली
तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा कल्पना अहिरे यांनी उपस्थितांना सांगितले की, ज्यांना कोणाला भोंगे लावायचे असतील त्यांना लावू द्या, कोणाला हनुमान चालीसा वाचायच्या असतील वाचावे, कोणाला जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या असतील तर त्यांनी त्या कराव्यात. परंतू आपण सर्वांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा व उच्च शिक्षण घेवून भारत देशाचा आदर्श नागरिक म्हणून नावारूपास आले पाहिजे. आता भारतीय संविधानाचे रक्षण करणे गरजेचे असून संसदीय लोकशाही टिकविणे या देशातील सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आणि डॉ.बाबासाहेबांच्या विचारातील भारत देश निर्माण करू या. असेही शेवटी सौ.अहिरे यांनी समता सप्ताह च्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतातून सांगितले
सदर सप्ताह १४ एप्रिल निमीत्त राबविण्यात आला. महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विकासाच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या विविध शासकीय विकास योजनांचा लाभ महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विकास अंतर्गत येणाऱ्या सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विवीध योजना गाव-वाड्यापर्यंत पोहोचविण्याची सुरुवात सावखेडा येथून करण्यात आली.यावेळी सौ. कल्पना अहिरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना या योजनांची माहिती दिली व जास्तीत जास्त या विविध विकास योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन त्यांनी केले
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम