ब्रेकअप झाल्यावर माझ्याही मनात आला आत्महत्येचा विचार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १६ डिसेंबर २०२२ I विवेक ओबेरॉय याने म्हटले आहे कि, , ‘माझं जेव्हा ऐश्वर्याशी ब्रेकअप झालं, तेव्हा केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर फिल्मी करिअरमध्येही खूप नुकसान झालं होतं. मी तब्बल 18 महिने रिकामा बसलो होतो. मी इतके चांगले चित्रपट देऊनही मला काम मिळत नव्हतं. माझ्या आयुष्यातील तो टप्पा इतका वाईट होता की मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, तो काळ असा होता की बॉलीवूडवर फक्त ५-१० लोकांचं नियंत्रण होतं आणि जर कोणाबद्दल काही गैरसमज असेल तर त्याला काम मिळायचं नाही. पण आता ओटीटी आल्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. खरं तर माझ्याबरोबर जे काही घडलं त्याबद्दल माझ्या मनात कटुता नाही, कारण मला पत्नी प्रियांका आणि आईचा खूप पाठिंबा आहे. विवेकने २०१० मध्ये प्रियंका अल्वाशी लग्न केलं, त्यांना दोन अपत्ये आहेत. विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, त्यात ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण एक वेळ अशी आली की विवेकच्या सर्वच चित्रपटांना फटका बसू लागला, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ लागली आणि त्याला काम मिळणं अवघड झालं. बराच काळ त्याला घरीच बसून राहावं लागलं, परिणामी त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम