मूव्हिंग इन विद मलायका भारती का रडली ढसाढसा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १६ डिसेंबर २०२२ I तिच्या शोमधील काही वाक्य, भन्नाट किस्से हे समोर येत असतात. नुकतीच कॉमेडी क्वीन भारती सिंगने तिच्या या कार्यक्रमात हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून सध्या तो जोरदार व्हायरल होत आहे. मलायका आणि भारतीने या एपिसोडमध्ये ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला असून खासगी आयुष्यावरून ट्रोल करणाऱ्यांना भारतीने सडेतोड उत्तर देखील यामध्ये दिल्याचं पाहायला मिळतं आहे.

शोमध्ये भारती भावूक झाली. तिचं आणि हर्ष लिंबाचिया याचं जेव्हा लग्न झालं. तेव्हा झालेलं ट्रोलिंग आठवून ती भावूक झालेली पाहायला मिळाली. शोमध्ये भारती सिंग आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल होण्याच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत. भारती म्हणते, “मला फक्त बाहेरच्या लोकांनीच नाही तर माझ्या घरच्या लोकांनीही खूप ट्रोल केलं. मला बरेचदा सांगितलं जायचं – बस झालं… मुलींनी एवढं खाऊ नये, भविष्यात काय करशील, तुझं लग्न होणार नाही. आणि हे सगळं ऐकून मला वाटायचं की माझ्या खाण्याचा आणि लग्नाचा काय संबंध? असे तिने सांगितले

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम