अजय देवगनच्या मुलीचे ३१ डिसेंबरच्या पार्टीचे फोटो प्रचंड व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ३ जानेवारी २०२३ । अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल हि जोडी नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असते.

ते सध्या त्यांच्या मुलीच्या 31 डिसेंबरच्या पार्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या पार्टीत त्यांची मुलगी निसा आपल्या मित्रांसोबत सहभागी झाली होती. तिचे पार्टीतील ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

काजोल आणि अजय देवगणने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपट केलेले आहेत. त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक आजही त्यांचे येणारे चित्रपट आवडीने पाहतात. शिवाय आजच्या जमान्यात काजोलपेक्षा अजय देवगण सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो. त्याच्याकडून अनेक प्रकारच्या पोस्टही केल्या जातात. त्याची लाडकी लेक असलेल्या निसा हिच्या बाबतीत काही दिवसापूर्वी ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मात्र, आता ती पुन्हा एका कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने नुकत्याच 31 डिसेंबरच्या पार्टीत सहभाग घेतला होता.

या पार्टीत निसाने हॉट लुकचा ड्रेस घालत रात्रीच्यावेळी पबमध्ये चांगलाच एन्जोय केला. यावेळी तिचे मित्रासोबतचे हॉट पोजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या ऐन तारुण्यातील फोटोमुळे ती आता बॉलिवूडमध्ये यायला तयार झाली असल्याचे दिसून येते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम