गौहर खानने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला बेबी बम्प

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ३ जानेवारी २०२३ । बिग बॉस फेम गौहर खानच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे.

लग्नाच्या दोन वर्षांनतर जैद दरबार आणि गौहर आई-बाबा होणार आहेत. सध्या गौहर आपली प्रेग्नेंन्सी एन्जॉय करतेय.अभिनेत्रीनं दुसऱ्या मॅरेज अनिव्हर्सरीच्या निमित्ताने चाहत्यांनासोबत ही गुडन्यूज शेअर केली. यानंतर चाहत्यांनी गौहरवर अभिनंदनचा वर्षाव केला. आता पहिल्यांदा गौहर आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.

गौहर खान वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार आहे. पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. फोटोंमध्ये, अभिनेत्रीने पांढरा स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीने तिचा लूक अतिशय साधा ठेवला आहे आणि कानातले असलेले केस मोकळे ठेवले आहेत. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसतोय. गौहरचे हे फोटो पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.

गौहर खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. ‘इशकजादे’, ‘रॉकेट सिंग’, ‘बेगम जान’, ‘तांडव’, ‘बेस्टसेलर’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यासह अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीज आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम