शहजादी मरियमच्या भूमिकेसाठी अवनीत कौर ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ६ जानेवारी २०२३ । टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर अलीबाबा -दास्तान ए काबुल या मालिकेचे काय होणार असा प्रश्न होता. तुनिशा आणि शिझान खान हे मुख्य पात्र होते.

टीआरपी मध्ये मालिकेचा चांगला परफॉर्मन्स होता.मात्र तुनिशाची आत्महत्या आणि शिझानची तुरुंगात रवानगी यामुळे मालिका थांबली. पण आता मेकर्सने मोठा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अलीबाबा चॅप्टर १ ऑफ एयर करत चॅप्टर २ ची सुरुवात दाखवण्यात येणार आहे. ‘शो’च्या दुसऱ्या चॅप्टरसाठी आता नवीन पात्रांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान अलीबाबाच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक निगमला साईन करण्यात आल्याची चर्चा आहे, तर शहजादी मरियम च्या भूमिकेसाठी अवनीत कौर दिसेल अशी शक्यता आहे.

अवनीत कौर तुनिशाच्या जवळच्या मित्रपरिवारातली एक होती. अलीबाबाच्या चॅप्टर २ मध्ये अवनीत असेल यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. जर ही नावं फायनल झाली तर अभिषेक आणि अवनीत पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. अवनीतने याआधी अभिषेकचा भाऊ सिद्धार्थ निगमसोबत ( ‘अलादीन’ या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील ही जोडी खूप पसंत केली गेली. आता अभिषेक आणि अवनीतची जोडीही खूप पसंत केली जाईल.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम