eMumbaiChaufer

शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

बातमी शेअर करा

शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

शहीद भगतसिंग म्हणजे अखंड ऊर्जा आणि प्रेरणास्रोत; लक्ष्मणराव पाटील

धरणगाव येथील शहीद भगतसिंग चौकात (सत्यनारायण चौक) महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. ‘इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज़्बातों से। अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंक़लाब लिख जाता है।’ — शहीद भगतसिंग. महान देशभक्त, क्रांतीवीर, शहीदे आजम शहीद भगतसिंग यांचे कार्य आजच्या पिढीसाठी अखंड ऊर्जा व प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन पाटील सरांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन भागवत यांच्यासह मयूर बागुल, प्रभाकर बिचवे, किशोर महाजन, खुशाल मांडगे, विकास मोरावकर, गणेश अहिरराव, भिकन अहिरराव, भूषण भागवत, तेजेंद्र चौधरी, अमोल सोनार, भूषण पाटील, आनंद मानकर, किरण सोनवनी, सागर जगताप तसेच नवदुर्गा मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहीद भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम