शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुलेच ; किशोर महाजन

शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुलेच ; किशोर महाजन

बातमी शेअर करा

शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुलेच ; किशोर महाजन

दादाजी नगरात सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा

धरणगाव : शहरातील दादाजी नगर येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव निमित्ताने महिला मुक्ती दिन – बालिका दिन व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम माळी यांनी केले. तत्पूर्वी ज्येष्ठ मान्यवर यादव माळी व दयाराम माळी यांच्या हस्ते ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. महिला मुक्ती दिन, बालिका दिनाचे औचित्य साधत यावेळी सावित्रीमाई फूले यांचे जीवनचरित्र पर ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण प्रसंगी किशोर मधुकर महाजन यांनी सावित्रीमाईंचा जीवनपट उलगडून त्यांचे शैक्षणिक, व सामाजिक कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुले हेच आहेत. क्रांतीसुर्य ज्योतिबा व सावित्रीमाई यांच्या विचारांवर चला व त्यांना आदर्श मानणे हेच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. असे अनमोल विचार किशोर महाजन यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत आई सावित्रीमाईंना अभिवादन केले.
यावेळी अशोक महाजन, मधुकर सिताराम माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ, नारायण माळी, बापू माळी, किरण माळी, सागर माळी, विकास माळी, श्रीराम माळी, वाल्मीक माळी, जयेश माळी, यश माळी, गणेश महाजन, जय महाजन, आदींनी क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर सोनवणे यांनी तर आभार भानुदास पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम