गुड शेपर्ड येथील विज्ञान प्रदर्शनाला विविध शाळांच्या भेटी

गुड शेपर्ड येथील विज्ञान प्रदर्शनाला विविध शाळांच्या भेटी

बातमी शेअर करा

गुड शेपर्ड येथील विज्ञान प्रदर्शनाला विविध शाळांच्या भेटी

विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे -कांता पाटील

कोणत्याही गोष्टीचा तार्किक विचार करणं म्हणजे विज्ञान -सपना पाटील

धरणगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आयोजित विज्ञान, कला आणि कार्यानुभवाच्या प्रदर्शनाला गावातील विविध शाळांनी सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की;गुड शेपर्ड स्कुलमध्ये कला, कार्यानुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित विविध उपकरणे तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये १ ते ४ च्या पूर्व प्राथमिक, ५ ते ८ च्या प्राथमिक व ९ – १० च्या उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि जवळजवळ ५६ उपकरणे उपकरणांनी हे प्रदर्शन सजले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील जीवशास्त्राच्या शिक्षिका कांता पाटील मॅम यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. तत्पूर्वी कांता पाटील मॅम आणि आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटक पाटील मॅम यांनी वस्तुनिष्ठपणे निरीक्षण नोंदवून अतिशय पारदर्शकपणे मूल्यांकन केले आणि त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल बंद लिफाफ्यात प्राचार्या चैताली रावतोळे यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रदर्शनाला गावातील अँग्लो उर्दू हायस्कूल, आदर्श माध्यमिक विद्यालय, पी.आर. हायस्कूल या विविध शाळांच्या विद्यार्थांनी व शिक्षकांनी भेटी दिल्यात. विद्यार्थी व शिक्षकवृंदानी उपकरणांची भरभरून स्तुती केली. नाविन्यपूर्ण, टाकाऊ पासून टिकाऊ, वैविध्यपूर्ण, समाजोपयोगी, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा सर्वंकषपणे समावेश असलेल्या उपकरणांनी सज्ज अशा प्रदर्शनात ज्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला त्यांना उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सपना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रदर्शनाला पी.आर.हायस्कूलचे चे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी.के.पाटील सर, अँग्लो उर्दूचे मुख्याध्यापक शेख शकिलोद्दीन शेख जमिलोद्दीन यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी पी.आर.हायस्कूल चे एस.पी.सोनार, एन.सी.पाटील, एन.आर.सपकाळे, एम.व्ही.पाठक, ज्ञानेश्वर गायकवाड तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल च्या आसमा मॅम, शानोद्दीन नुरोद्दीन, हाजी उस्मान गनी शेख, पठाण वसिम खान मेहमूद खान, सय्यद आरिफ अली कमर अली, सय्यद मुश्ताक अली मोहब्बत अली, सय्यद अजहर अली युनुस अली, नदीम खान बाबू खान पठाण यांच्यासह आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्रविण पाटील, मुकेश तोरवणे आदी सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका सपना पाटील, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. प्रदर्शनाला शिक्षक, पालक, विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम