ऑस्कर विजेत्या चित्रपटातील अभिनेत्रीला इराणमध्ये अटक

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १८ डिसेंबर २०२२ I इराणमध्ये चालू असलेलं वातावरण सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिथून येणाऱ्या खळबळजनक बातम्या मन सुन्न करतात. आता इराणमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

इराणच्या टॉप मोस्ट अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. इराणच्या ऑस्कर-विजेता चित्रपट “द सेल्समन” मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तरानेह अलीदोस्तीला अटक झाली आहे. शनिवारी, 17 डिसेंबर रोजी, इराणी अधिकाऱ्यांनी तराणेह अलीदोस्ती यांना देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल खोटी बातमी पसरवल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली आहे. सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली.

https://www.imdb.com/name/nm1267552/?ref_=ext_shr_lnk
वृत्तसंस्था IRNA च्या वृत्तानुसार, ऑस्कर विजेत्या चित्रपट ‘द सेल्समन’ अभिनेत्री तरानेह अलीदोस्तीने आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने आंदोलनादरम्यान केलेल्या गुन्ह्यांसाठी नुकतीच फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीचे समर्थन केले होतेतरानेह अलिदुस्ती व्यतिरिक्त, इराणच्या न्यायिक संस्थांनी इतर अनेक सेलिब्रिटींना देखील प्रक्षोभक पोस्ट केल्याबद्दल समन्स पाठवले आहेत. त्यापैकी काहींना अटकही करण्यात आली आहे.

अलिदोस्तीला अटक करण्यात आली कारण ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या दाव्यांच्या बॅकअपसाठी कोणतीही कागदपत्रे सादर करू शकली नाही.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम