खुशखबर ! बांधकाम कामगारांसाठी तीन नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली…

बातमी शेअर करा

राज्यातील बांधकाम उद्योजकांना मोठ्या प्रमाणात चालना मिळावी यासाठी बांधकाम मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीन नव्या कल्याणकारी व फायदेशीर योजनांना मंजुरी दिल्ली आहे.

कामगार विभागातर्फे या नवीन तीन योजना आम्लांत आणल्या जातील. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असल्यास या योजनाचा लाभ घेऊ शकतात. या तीन योजना कामगार व त्यांच्या कुटुंबाला सहकार्य मिळवून देऊ शकतात. अशा प्रकारच्या कामगार कल्याणकारी योजना हसन मुश्रीफ यांनी सादर केल्या आहेत.

या योजनांमध्ये कामगारांच्या मुलीच्या लग्नकार्यासाठी सदर अर्थसहाय्य खर्च म्हणजे मुलीला 51 हजार रुपये देण्यात येतील तसेच, कामगारांचा मृत्यू , अपघात झाल्यास त्यांच्या त्यांच्या मुळ गावी पोहचवण्यासाठी लागणारा खर्च व अंतिम संस्कार याबातीतले अर्थसहाय्य केले जाईल. आणि समजा एखाद्याला गंभीर दुखापत किंवा हात-पाय निकमी झाल्यास त्यांच्यावर कृत्रिम पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जातील.

सध्या कामगार योजनांकडे 29 वेगवेगळ्या योजना कामगारांसाठी राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुरक्षित ,शैक्षणिक ,सामाजिक, आर्थिक व आरोग्यिक यांचा समावेश हा आहेच. आता मात्र यामध्ये या नवीन तीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

कामगार कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेतील?
कामगारांची सोय लक्षात घेऊन कामगार मंडळ 25 जुलै 2020 पासून ॲानलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ या सुविधा सुरू केलेल्या आहेत. मात्र ज्या बांधकाम कामगारांवर अद्यापही काही माहिती नाही त्यांनी ‘www.mahabocw.in’ या संकेतस्थळावर जाईन अधिक माहिती प्राप्त करून नोंदणी करू शकतात.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम