भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा काँग्रेस उमेदवारांवर चांगलाच पलटवार!
आजकाल टिकाकरण करण्यात उत्तम माध्यम म्हणजे ट्विटर. आणि ट्विटरच्या माध्यमातून सध्या राजकीय विषयावर जास्तीत जास्त टिकाकरण सुरूय.
काँग्रेस नेते ट्विटरच्या माध्यमातून भाजप पक्षावर वारंवार टिका करत असतात. त्यातच अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेत्यांवर चांगलाच टोला लगावला आहे. राजकीय मुद्द्यांवरुन ते ट्विटरवर चांगलेच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी केलेलं एक ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला अक्षरश: भिकेला लावलं असल्याचा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी काँग्रेसला लगावला आहे.
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार सध्या घरोघरी जाऊन भिकारी समजून मत द्या अशी विनवणी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. या उमेदवाराची उत्तराखंडमध्ये जोरदार चर्चा देखील सुरू आहे. याच बातमीचा दाखला देत अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते असं म्हणाले, एकेकाळी देशावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या काँग्रेसला मोदीजींनी अक्षरश: भिकेला लावले आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. यासाठी भातखळकरांनी ‘लोकमत’नं केलेली बातमी देखील ट्विट केली आहे.
तेरही गरवाल येथील घनसाली विधानसभा मतदार संघात देखील अशाच एका काँग्रेसचे उमेदवार धनीलाल शाह घरोघरी मत भित मागत आहे असे दिसून आले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम