दहशतवादी अबू बकरला यूएईमधून अटक, भारतीयांना मिळाले यश

बातमी शेअर करा

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी अबू बकरला भारतात आणले जाणार असून तो दाऊदचा हस्तक आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकर याला यूएईमधून अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले.गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला अबू बकरला पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आले आहे.

ही अटक यूएई एजन्सींच्या सहकार्याने केलेली असून त्याला लवकरच भारतात आणले जाईल. अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जातो. त्याच्या अटकेसाठी ऑपरेशन सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो पाकिस्तान आणि यूएईमध्ये लपून बसल्याची माहिती मिळत होती. परदेशातील मोठ्या ऑपरेशनमध्ये मुंबई साखळी बाँबस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातमधून अटक केल्याने भारतीय एजन्सीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

मुंबईत 1993 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू तर 713 लोक जखमी झाले होते. 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले होते. विशेष म्हणजे अबू बकरला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती मात्र काही दस्तएवजांच्या त्रुटींमुळे त्याची यूएईत सुटका झाली होती. कागदपत्रांअभावी त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिले. मात्र, पुन्हा भारतीय यंत्रणांना यश मिळाले असून आता त्यांनी त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम