कंगनाने केली स्व. लता मंगेशकरांशी तुलना

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २३ डिसेंबर २०२२ I बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत येत असते. यामुळं ती बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

त्यातच कंगनानं नुकतीच स्वत:ची तुलना थेट भारतरत्न लता मंगेशकर(यांच्याशी केली आहे.

कंगनानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गायिका आशा भोसले यांनी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये आशा भोसले यांनी सांगितलं आहे की, लता मंगेशकर कधीच लग्नसमारंभात गायच्या नाहीत. यासाठी त्यांना कितीही पैसा देऊ केला तरीही त्या लग्नात गायला नकार द्यायच्या. आशा भोसलेंचा हा व्हिडीओ डान्स इंडिया डान्स लिल मास्टरच्या शोदरम्यानचा आहे.

हा व्हिडिओ शेअर करत कंगनानं स्वत:बद्दल लिहिलं आहे की, या विचारांशी सहमत. माझ्याकडं लोकप्रिय गाणी असून मीही कधीच लग्न किंवा खाजगी पार्ट्यांमध्ये नाचले नाही. मी मोठ्या रक्कमेला नाही म्हणाली आहे. मला हा व्हिडिओ पाहून आनंद झाला. लता जी खूप प्रेरणादायी आहेत.

दरम्यान, कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती ‘तेजस’ या चित्रपटातही झळकणार आहे.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम