‘बिग बॉसमध्ये टीना दत्ता आणि श्रीजिता डेने यांच्यात टक्कर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २३ डिसेंबर २०२२ Iछोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या बिग बॉस 16 चा चांगलाच धुमाकूळ पहायला मिळत असून सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय.
बिग बॉसच्या घरात कधी मैत्री तर कधी शत्रुत्त्व पहायला मिळतं. दिवसेंदिवस शो जसा पुढे सरकतो तसतसा स्पर्धकांचा खरा चेहरा समोर यायला लागतो. अशातच घरात आल्यापासून दोन स्पर्धकांचं वैर दिसून आलं होतं. हे दोन स्पर्धक दुसरे कोणी नसून टीना दत्ता आणि श्रीजिता डे आहेत.


टीना दत्ता आणि श्रीजिता डेने अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. आता पुन्हा एकदा श्रीजिताने टीनावर धक्कादायक आरोप केले आहेत. समोर आलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये श्रीजिता डे टीना दत्तावर गंभीर आरोप करताना दिसून आली. व्हिडीओमध्ये दिसतंय की श्रीजिता आणि सौदर्या बोलत आहे.

श्रीजिता सौदर्याला सांगते, ‘ती मुलांच्या अटेंशनशिवाय राहुच शकत नाही. खूप लोकांची घरं तोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आत्तापर्यंत स्वतःचा संसार करु नाही शकली. ती आतून एवढी दुःखी आहे की ती लोकांचे पाय खाली खेचून त्यातून आनंद घेते.’

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम