दिशा आणि अलेक्झांडरचा एक फोटो व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ६ जानेवारी २०२३ । बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीचं चर्चेत असते. सध्या चित्रपटांऐवजी दिशा पाटनीचे नाव तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सतत चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पाटनीचे नाव तिचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर अॅलेक्स अलिक सोबत जोडले जात आहे. दरम्यान, दिशा आणि अलेक्झांडरचा एक फोटो समोर आला आहे. यावर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने प्रतिक्रिया दिली आहे.

अलेक्झांडर अॅलेक्स अलिक त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल अभिनेत्री दिशा पटनीसोबत फोटो शेअर करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. गुरुवारी देखील अलेक्झांडर अॅलेक्स अलिकने दिशा पटनीसोबतचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. दिशा आणि अलेक्झांडरची जवळीक या फोटोंमधून सहज लक्षात येते. तसेच, हे फोटो पाहून, अलेक्झांडर अॅलेक्स अलिक आणि दिशा पटनी प्रत्यक्षात एकमेकांना डेट करत असल्याचा दावा आणखी मजबूत होताना दिसत आहे

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम