पुण्यातील शाळांबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

बातमी शेअर करा

 

पुण्यातील कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या आता कमी होत आहे. त्यासोबतच लसीकरण सुद्धा वेगाने होत आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून शहरातील 1 ते 8 वीपर्यंतच्या शाळा हाफ डे पद्धातीने सुरु केल्या होत्या. मात्र आता हाफ डे बंद करून पूर्णवेळ शाळा सुरू करणार, हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आली. जागतिक परिस्थिती पाहता नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. पण दैनंदिन कोविड मृतकांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मागचं नक्की कारण डॉक्टरांकडून शोधण्याचं काम सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णसंख्या बघून शाळांबाबतच निर्णय घेण्यात आला होता. पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी जेवढी लस पाहिजे तेवढी नाही.शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. दुसरीकडं जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असताना मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.ग्रामीण भागात चांगले लसीकरण झाले आहे. सोमवारी लसींचा साठा उपलब्ध होईल. मी सुद्धा मुंबईत गेल्यावर संबंदितांसोबत बोलतो. कुठेही लसींचा तुटवडा होता कामा नये. जम्बो हॉस्पिटलचा निर्णय 18 फेब्रुवारीनंतर घेण्यात येईल.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम