गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा

गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

कर्तृत्ववान महिला याच खऱ्या सावित्रीच्या लेकी;नाजनिन शेख

धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये बालिका दिन, महिला मुक्ती दिन,महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
बालिका दिनाचे औचित्य साधून क्रिषा (नर्सरी), ज्ञानदा (ज्युनिअर), क्रांती (सिनियर) या बालकांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापन जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी माईंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उपशिक्षक लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून माईंच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी बालिका दिन व महिला मुक्ती दिनाचे तसेच महिला शिक्षण दिनाचे महत्व वर्णन केले. कर्तृत्ववान महिला या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी असल्याचं मत मुख्याध्यापिका शेख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे यांच्यासह रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, प्रियंका मोरे, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, सागर गायकवाड हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम